फटाके उडविण्याच्या कारणावरून झालेल्या वादात सहाजणांनी कोयता व दगडाने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले. या प्रकरणी माणिक सदाशिव भंडारे (वय ५० रा. चिंतामणी गली नं. ८ कोरोची) यांनी सहा अनोळखी व्यक्तींच्या विरोधात शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी शहापूर पोलिसांनी अनिरुध्द अनिल डिंगणे (वय २६) आणि संजय प्रकाश हिटनळी (वय २५ रा. दातार मळा) या दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अनिरुध्द डिंगणे संजय हिटनळी
याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी, कोरोची येथील माणिक भंडारे हे मंगळवारी रात्रीच्या सुमारास आपल्या घरासमोर कुटुंबियासमवेत फटाके उडवित होते. त्यावेळी मोटारसायकलवरून निघालेल्या अनोळखी तिघांनी त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर काही वेळानंतर त्या अनोळखी तिघांस आणखीन तिघेजण मोटारसायकलवरून आले व त्यांनी माणिक भंडारे, त्यांचा “मुलगा रतन आणि पत्नी मनिषा भंडारे यांच्याशी पुन्हा वाद सुरु केला. त्यातूनच एकाने आता याला सोडायचे नाही म्हणत लोखंडी कोयत्याने चारवेळा माणिक यांच्या डोक्यात वार केले. त्याचबरोबर रतन आणि मनिषा या दोघांनाही शिवीगाळ करत दगड फेकून मारले. यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी अज्ञात सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे






