Saturday, October 25, 2025
Homeमहाराष्ट्रIRCTC वेबसाइट आणि अ‍ॅपची सेवा ठप्प! ऐन सणासुदीत तिकीट बूकिंगला अडचणी, प्रवाशी...

IRCTC वेबसाइट आणि अ‍ॅपची सेवा ठप्प! ऐन सणासुदीत तिकीट बूकिंगला अडचणी, प्रवाशी संतप्त

अनेक युजर्सनी यासंदर्भात सोशल मीडियावर तक्रार केली आहे.IRCTCच्या संकेतस्थळावर सध्या साइट सुरू नाहीय. थोड्या वेळानं प्रयत्न करा असा मेसेज येत आहे.

 

दिवाळीआधीही प्रवाशांना तिकीट बूकिंगमध्ये अडचणी आल्या होत्या. पुन्हा एकदा संकेतस्थळ डाऊन झाल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय. याआधी संकेतस्थळ डाऊन झालं होतं तेव्हा काही तासातच सेवा पूर्ववत झाली. पण आता संकेतस्थळ डाऊन झाल्यानंतर लाखो प्रवाशांची अडचण निर्माण झाली आहे.

 

रेल्वेकडून अद्याप संकेतस्थळ डाऊन झाल्याबाबत काही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. प्रवाशांना तिकीट कसं बूक करायचं असा प्रश्न आता पडला आहे. यूजर्सनी सोशल मीडियावर संकेतस्थळ आणि अॅप काम करत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. डाऊनफॅक्टर या संकेतस्थळानेही रेल्वेची तिकीट बूकिंग सुविधा ठप्प झाली असल्याचं म्हटलंय.

 

सोशल मीडियावर युजर्सनी केलेल्या पोस्टनुसार, सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तिकीट बूकिंगला अडचणी येऊ लागल्या. या वेळेतच तात्काळ, प्रीमीयम तात्काळ तिकीट बूकिंग सुविधा सुरू होते. सर्वाधिक प्रवाशांकडून या वेळेतच बूकिंगचा प्रयत्न केला जातो. यामुळे बहुतांश वेळा तिकीट बूकिंग करण्यास अडचणी येतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -