Monday, November 24, 2025
Homeकोल्हापूरबंगला फोडून 34 तोळे दागिन्यांवर डल्ला

बंगला फोडून 34 तोळे दागिन्यांवर डल्ला

बंगला फोडून 34 तोळे दागिन्यांवर डल्ला

 

राजोपाध्येनगर येथील मुख्य रस्त्यावरील अरविंद विश्वनाथ शेट्टी यांचा विश्वपार्वती बंगला फोडून चोरट्यांनी 34 तोळे सोन्याचे व एक किलो चांदीचे दागिने, शिवाय रोख रक्कम असा 32 लाख 82 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.

 

ऐन दिवाळीच्या धामधुमीत बुधवारी (दि. 22) रात्री आठ ते साडेदहा या वेळेत हा प्रकार घडला. चोरट्यांच्या शोधासाठी नाकाबंदी करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजद्वारेही माग काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र सुगावा लागला नाही. माहीतगार सराईताकडून हा प्रकार झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. अशोक केसरकर यांच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त फुलेवाडी रिंग रोडवरील हॉटेलमध्ये आयोजित समारंभासाठी शेट्टी कुटुंबीय गेले होते. याच काळात चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजूच्या खिडकीचे ग्रील कटावणीने उचकटले. बेडरूममध्ये प्रवेश करून लाकडी कपाटातील सोने-चांदीचे दागिने, कपाटातील रोख रक्कम असा 32 लाख 82 हजाराचा ऐवज लंपास केला.

 

परिसराची नाकेबंदी, फॉरेन्सिक लॅबसह ठसेतज्ज्ञही घटनास्थळी

 

वाढदिवसाचा समारंभ आटोपून शेट्टी कुटुंबीय परतल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, पोलिस उपअधीक्षक (गृह) तानाजी सावंत, प्रभारी निरीक्षक सुशांत चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथकासह ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी दाखल झाले. परिसराची नाकाबंदी करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजद्वारेही चोरट्यांचा माग काढण्यात आला. मात्र कोणतेही सुगावे हाती लागले नव्हते. माहीतगार टोळक्याकडूनच हा प्रकार झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. चोरट्याना लवकर बेड्या ठोकण्यात येतील, असा विश्वास पोलिस अधिकार्‍यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -