Saturday, October 25, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन कुटुंबांत हाणामारी

इचलकरंजीत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन कुटुंबांत हाणामारी

महिलेचा विनयभंग तसेच अश्लील वर्तन केल्याच्या कारणावरून करण्यात आलेल्या हल्ल्यात तसेच घरात घुसून केलेल्या मारहाणीत सहा जण जखमी झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली असून, पोलिसांनी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

चार दिवसांपूर्वी ही घटना घडली.

 

भोनेमाळ परिसरात राहणारी विवाहिता आपल्या पतीसह निघाली असता संशयितांनी तिच्याकडे पाहून अश्लील वर्तन करीत विनयभंग केला. याचा जाब तिच्या पतीने विचारला असता संशयितासह सहाजणांनी कोयता, फरशी, दगड याने दहशत माजवत पत्नी व विवाहितेवर हल्ला केला. पीडितेच्या डोक्यात कोयत्याने वार झाले, तर पतीला दगडाने मारहाण करण्यात आली. वाद सोडवण्यासाठी आलेल्यांनाही मारहाण करण्यात आली.

 

दरम्यान, पीडित विवाहिता, तिचा पती यांच्यासह अन्य संशयितांनी घरात घुसून धक्काबुक्की व मारहाण केल्याची परस्परविरोधी फिर्याद आणखी एका महिलेने दिली आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोहेकॉ भांगरे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -