भारताचा स्टार क्रिकेटपटू श्रेयस अय्यरला सध्या दुखापत झाली आहे. त्याच्यावर सिडनी येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान झेल पकडताना त्याला गंभीर दुखापत झाली आहे. सुरुवातीला त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार चालू होते. दरम्यान, आता श्रेयस अय्यरच्या प्रकृतीबाबत भारतीय संघाचा टी-20 प्रकारातील कर्णधार सूर्यकुमार यादव याने महत्त्वाची माहिती दिली आहे. सूर्यकुमार तसेच भारतीय क्रिकेट संघातील इतर खेळाडूंचं श्रेयससोबत फोनच्या माध्यमातून बोलणं चालू आहे.
नेमकी काय माहिती समोर आली आहे?
क्रिकबझ या क्रिकेटविषयक माहिती देणाऱ्या वृत्तसंकेतस्थळाने श्रेयस अय्यरच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. ही माहिती देताना सूर्युकमारने दिलेल्या माहितीचा आधार घेतला आहे. सूर्यकुमारने सांगितल्यानुसार भारतीय संघाचे खेळाडू टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून श्रेयस अय्यरच्या संपर्कात आहेत. आम्ही पाठवलेल्या मेसेजेसला श्रेयस अय्यर रिप्लाय देत आहे, असे सूर्यकुमारने सांगितले आहे. तसेच श्रेयस अय्यर जर फोनच्या माध्यमातून आमच्या मेसेजेसना उत्तरं देत असेल तर त्याची प्रकृती स्थिर आहे, असे आपण समजू शकतो. त्याची काळजी घेण्यासाठी तिथे डॉक्टर आहेत. श्रेयस अय्यर आमच्यासोबत बोलतो आहे म्हणजेच त्याची प्रकृती चांगली आहे, असेही सूर्यकुमारने सांगितले आहे.
श्रेयस अय्यरची प्रकृती स्थिर
दरम्यान, श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यानंतर त्याला तातडीने सीडनीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्यावर सुरुवातीला थेट आयसीयूत उपचार करण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थीर असून त्याला आयसीयून बाहेर काढण्यात आले आहे. झेल घेताना मुलाला दुखापत झाल्याचे समजताच श्रेयस अय्यरचे आई-वडील सीडनीत पोहोचले आहेत. लवकरच श्रेयस बरा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






