सोमवारी दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत आणि अभिनेता धनुष यांच्या घरी अचानक पोलिस पोहोचले. त्यांच्यासोबत बॉम्ब स्क्वॉड देखील हजर झाले. रजनीकांत यांच्या घरी अचानक पोलीस आल्यामुळ चाहत्यांना प्रश्न पडला आहे नेमकं झालं तरी काय? रजनीकांत यांच्यासोबत त्यांच्या मुलीचा पूर्वपती अभिनेता धनुषच्या घरी देखील पोलीस पोहोचले आहेत. आता नेमकं प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया…
सुपरस्टार रजनीकांत आणि धनुष यांना धमकी मिळाली होती. तमिळनाडूच्या डीजीपींना ईमेलद्वारे सुपरस्टार्सचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी आली. त्यानंतर पोलिसांनी सुपरस्टार्सची सुरक्षा वाढवली आणि या प्रकरणाचा तपास केला. एका अहवालात या धमक्या बनावट असल्याचं सांगितलं गेलं. द हिंदूच्या अहवालानुसार, काही अज्ञात व्यक्तींनी डीजीपींना ईमेलद्वारे धमकी दिली. ज्यात सांगितलं की धनुष आणि रजनीकांतच्या घरात बॉम्ब ठेवले आहेत. या मेलनंतर खळबळ उडाली आणि पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.
रजनीकांत आणि धनुषच्या घरात बॉम्ब?
या धमकीच्या ईमेलनंतर पोलिस बॉम्ब निरोधक पथकासह रजनीकांतच्या घरी पोहोचले आणि तपासणी केली. अगदी तसंच धनुषच्या घरीही तपासणी करण्यात आली. त्यानंतर कळलं की हे बनावट मेल होते.
या स्टार्सनाही मिळाली होती धमकी
यापूर्वी २ ऑक्टोबर रोजी एका ईमेलद्वारे धमकी देण्यात आली होती. ज्यात सांगितलं होतं की राज्यातील अनेक व्हीआयपी कार्यालये आणि घरे यात बॉम्ब ठेवले आहेत. या यादीत अभिनेत्री तृषा कृष्णन आणि इतरांचं नावही होतं. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अभिनेता आणि नेता विजय यांच्या घरात बॉम्ब ठेवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली होती. ज्याने बनावट कॉल केला होता.
इलैयाराजालाही मिळाली होती धमकी
इतकंच नव्हे तर १४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा यांच्या स्टुडिओतही असे बनावट मेल आले होते. पोलिसांच्या तपासात हे मेल बनावट असल्याचं आढळलं.






