Friday, October 31, 2025
Homeतंत्रज्ञानJio Plan: एकदा रिचार्ज करा अन् 11 महिने लाभ घ्या, जिओचा खास...

Jio Plan: एकदा रिचार्ज करा अन् 11 महिने लाभ घ्या, जिओचा खास प्लॅन

भारतात जिओ आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. जिओ आपल्या स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी ओखळली जाते. जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अशा काही प्लॅनचा समावेश आहे जे लाखो ग्राहकांसाठी फायदेशीर आहेत.

 

 

जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दीर्घकाळ वैधता असलेल्या प्लॅनची संख्या वाढवली आहे. जिओ कंपनी तुम्हाला 84 दिवसांपासून 365 दिवसांपर्यंतचे प्लॅन ऑफर करते.

जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दीर्घकाळ वैधता असलेल्या प्लॅनची संख्या वाढवली आहे. जिओ कंपनी तुम्हाला 84 दिवसांपासून 365 दिवसांपर्यंतचे प्लॅन ऑफर करते.

 

तुम्ही फक्त कॉलिंगसाठी प्लॅनच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता कमी किमतीत संपूर्ण वर्षासाठी अमर्यादित कॉल करू शकता. याची माहिती जाणून घेऊयात.

 

जिओच्या कॉलिंगसाठीच्या रिचार्ज प्लॅनची किंमत फक्त 1784 आहे. हा रिचार्ज प्लॅन 336 दिवसांच्या किंवा अंदाजे 11 महिन्यांच्या वैधतेसह येतो. यात तुम्ही 336 दिवस सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेऊ शकता.

 

जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 3600 एसएमएस मोफत मिळतात. तसेच या प्लॅनमध्ये जिओ टीव्हीचा मोफत अॅक्सेस मिळतो. तसेच जिओ एआय क्लाउडचा अॅक्सेस देखील मिळतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -