Friday, October 31, 2025
Homeमहाराष्ट्रदिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडली, मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू; काय...

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडली, मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू; काय झालं?

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चाहते त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

 

अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली

समोर आलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशातच आता धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांच्या जवळील सूत्रांनी याबाबर बोलताना सांगितले की, काळजी करण्यासारखं काहीही नाही. आरोग्याच्या समस्यांमुळे खबरदारीचा उपाय म्हणून धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रूटीन चेकअप साठी त्यांना रूग्णालयात नेले असल्याचे समोर आले आहे.

 

2023 मध्येही प्रकृती बिघडली होती

धर्मेंद्र यांची प्रकृती याआधीही बिघडली होती. 2023 मध्ये त्यांचा मुलगा सनी देओल त्यांना अमेरिकेला उपचारासाठी घेऊन गेला होती. वयोमानानुसार त्यांना त्रास होत असल्याचे समोर आले होते. त्यावळी धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी यांनी ते नियमित तपासणीसाठी रूग्णालयात गेले होते अशी माहिती दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

धर्मेंद्र इक्कीस चित्रपटात दिसणार

धर्मेंद्र हे अजूनही चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहेत. ते अगस्त्य नंदाच्या इक्कीस या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. आतापर्यंत त्यांनी आपल्या कारकिर्दीत 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. यातील फूल पत्थर, चुपके चुपके, शोले आणि धरम वीर या सुपपहीट चित्रपटांचा समावेश आहे.

 

धर्मेंद्र सोशल मीडियावर सक्रिय

धर्मेंद्र हे सोशल मीडियावरही सक्रिय आहेत. ते इन्स्टाग्रामच्या मदतीने चाहत्यांना माहिती देत असता. ते जुन्या आठवणी आणि चित्रपटाशी संबंधित कथा शेअर करत असतात. अलिकडेच त्यांना डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘इक्किस’ चित्रपटाचा ट्रेलर देखील पोस्ट केला. यावर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्स पाऊस पडला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -