सुवर्णसंधी! महाराष्ट्र पोलीस दलात 15 हजार जागांसाठी भरती, आजच करा अर्ज, अंतिम तारीख काय?महाराष्ट्र पोलीस दलात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
राज्य सरकारने पोलीस दलात एकूण 15 हजार रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती प्रक्रिया इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे इच्छुकांनी त्यापूर्वी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, 2020 ते 2025 या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली आहे, त्यांना देखील या भरतीमध्ये अर्ज करण्याची अखेरची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे, वयोमर्यादेमुळे वंचित राहिलेल्या उमेदवारांना आता पोलीस दलात रुजू होण्याची पुन्हा एक संधी मिळाली आहे. उमेदवारांनी तपशीलवार माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.




