महिला क्रिकेट वनडे वर्ल्ड कप 2025 चा अंतिम सामना आज होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आणि साऊथ आफ्रिकन महिला क्रिकेट संघ यांच्यात हा सामना रंगणार आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये हा सामना खेळला जाणार आहे. हरमनप्रीत कौर आणि संघाने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले होते. टीम इंडिया तिसऱ्यांदा फायनल खेळत आहे, तर साऊथ आफ्रिकेचा इतिहासातील पहिलाच वनडे वर्ल्ड कप फायनल आहे. दोघांपैकी एक संघ आज आपले पहिले विजेतेपद जिंकेल. भारतीय संघाने हा वर्ल्ड कप जिंकला तर किती रक्कम मिळणार असा प्रश्न सर्वांन पडला आहे.
महिला वनडे वर्ल्ड कप 2025 फायनलचे सर्व तिकीट विकले गेले आहेत, हा सामना आज (2 नोव्हेंबर) नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होईल. त्यामुळे चॅम्पियन संघाला मागच्या तुलनेत यावेळी खूप जास्त पैसे मिळणार आहेत. आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच बक्षिसाची रक्कम जाहीर केली होती. ही रक्कम पुरुष वर्ल्ड कप विजेत्या संघापेक्षाही जास्त आहे.
महिला वनडे वर्ल्ड कप 2025 जिंकणाऱ्या संघाला 4.48 मिलियन डॉलर बक्षिसाची रक्कम मिळेल. ही रक्कमभारतीय चलनात सुमारे 40 कोटी रुपये आहे. 2023 पुरुष वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला 4 मिलियन डॉलर मिळाले होते. आज जो संघ हरेल त्याला 2.24 मिलियन डॉलर, म्हणजे सुमारे 20 कोटी रुपये मिळतील.
जर हरमनप्रीत कौर आणि संघाने आज साऊथ आफ्रिकेला हरवून आपला पहिला वर्ल्ड कप जिंकला तर BCCI देखील संघावर पैशांची उधळण करू शकते. अहवालानुसार BCCI विजयानंतर टीम इंडियाला तितकीच धनराशी बक्षिस म्हणून देईल, जितकी भारतीय संघाला टी20 वर्ल्ड कप जिंकल्यावर दिली होती.
गेल्या वर्षी टी20 वर्ल्ड कप जिंकल्यावर BCCI ने टीम इंडियासाठी १२५ कोटी रुपये बक्षिसाची रक्कम जाहीर केली होती. आता अपेक्षा आहे की हरमनप्रीत कौर आणि संघ तसेच स्टाफलाही BCCI इतकीच धनराशी देईल, जर भारत चॅम्पियन झाला तर.
महिला ओडीआय वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होत आहे की फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड यापैकी कोणताही संघ नाही. भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले होते आणि साऊथ आफ्रिकेने इंग्लंडला हरवून फायनल गाठले आहे.




