Thursday, November 13, 2025
Homeकोल्हापूरअवघ्या ६ दिवसांत ३ खून! कंक खून प्रकरणाच्या तपासात तिसऱ्या हत्येची कबुली

अवघ्या ६ दिवसांत ३ खून! कंक खून प्रकरणाच्या तपासात तिसऱ्या हत्येची कबुली

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील कंक दाम्पत्याच्या दुहेरी खून प्रकरणाचा तपास करताना सराईत गुन्हेगार विजय मधुकर गुरव (वय ४०, रा. शिरगांव, ता. शाहूवाडी) याच्या चौकशीत आणखी एका धक्कादायक खुनाची माहिती समोर आली आहे

 

गुरव याने रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील रायपाटण-टक्केवाडी येथील वैशाली शांताराम शेट्ये (वय ७४) या वृद्ध महिलेचा खून केल्याची कबुली दिली आहे. अवघ्या सहा दिवसांत तीन खून केल्याची ही माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

 

६ दिवसांत ३ खून : गुन्हेगारीचा थरार

 

१३ ते १५ ऑक्टोबर : गुरवने राजापूरच्या रायपाटण-टक्केवाडी येथे एकट्या राहणाऱ्या वैशाली शेट्ये यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला. शेट्ये यांनी प्रतिकार केल्यामुळे गुरवने घरातील वरंवट्याने ठेचून त्यांचा निर्घृण खून केला आणि सोने व रक्कम चोरून नेली. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. वैशाली शेट्ये यांच्या खुनानंतर लपण्यासाठी तो शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरण पाणलोट क्षेत्रातील गोलीवणे वसाहत येथे १६ ऑक्टोबर, सायंकाळी ७ च्या सुमारास आला. येथे त्याने निनू यशवंत कंक (वय ७०) आणि त्यांची पत्नी रखुबाई निनू कंक (वय ६५) या दाम्पत्याचा शाब्दिक वाद झाल्यानंतर चिडून खून केला. कंक दाम्पत्याचे मृतदेह १९ ऑक्टोबर रोजी आढळून आले होते.

 

पोलिसांच्या तावडीतून पळाल्याची चर्चा

 

विजय गुरव याला २ ऑक्टोबरच्या दरम्यान शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या चौकशीदरम्यान अलंकार हॉल येथील रुममधून तो पळून गेल्याची चर्चा आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांनीही याबाबत आरोप केला आहे. कंक दाम्पत्याचा खून केल्यानंतर गुरव पुन्हा रत्नागिरी परिसराकडे गेला होता आणि त्याने तेथे घरफोड्या व मोबाईल चोरी केल्याचेही उघड झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -