Wednesday, November 12, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर प्रवेशद्वाराची कमान हटवणार...

कोल्हापूर प्रवेशद्वाराची कमान हटवणार…

शहराची ओळख असलेल्या आणि सध्या जीर्ण तथा धोकादायक बनलेल्या कोल्हापूर प्रवेशद्वाराची (कमान) सुरक्षिततेच्या कारणास्तव आज गुरुवारी (६ नोव्हेंबर) रात्री अखेरची निष्कासन (पाडकाम) प्रक्रिया सुरू होणार आहे.

 

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, कमानीच्या परिसरातून होणारी वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात येणार आहे.

 

रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत काम सुरू राहणार

 

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कमान पाडण्याचे काम आज रात्री १० वाजल्यापासून ते उद्या सकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. हे काम जेसीबीच्या सहाय्याने केले जाईल. यामुळे, रात्रभर नागरिकांनी दुसऱ्या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

महानगरपालिकेचे आवाहन

 

“नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत जीर्ण कमान पाडण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रभर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी सहकार्य करून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

नवीन कमान व बास्केट ब्रिजचा प्रस्ताव

 

अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या या प्रवेशद्वाराच्या जागी नवीन आणि आकर्षक कमान उभी करण्यासाठी महापालिकेने यापूर्वीच तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात बास्केट ब्रिजलाही मंजुरी मिळाली आहे. मात्र, निधी मंजूर असूनही नवीन कमान नेमकी कुठे उभारली जाईल आणि बास्केट ब्रिजचे नियोजन नेमके कसे असेल, याबद्दलचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे अंतिम नियोजन लवकरच निश्चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -