बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडिया बँकेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. फायर सेफ्टी ऑफिसर पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे फायर सेफ्टी संबंधित जर शिक्षण पूर्ण केले असेल तर तुम्हाला नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे.
इंडियन बँकेतील फायर सेफ्टी ऑफिसर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर मिळणार आहे.
इंडियन बँकेतील ही भरती चेन्नईतील हेडक्वार्टर येथे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांती निवड भरती मोहिमेद्वारे होणार आहे. त्यांना असोसिएट मॅनेजर सीनियर ऑफिसर पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे.
इंडियन बँकेत ६ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी २३ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांनी ३ वर्षांसाठी काम करायचे आहे. त्यानंतर पुढे कामाचा कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढवला जाईल. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वरे होणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने नेशनल फायर सर्विसेज कॉलेज (NFSC) नागपुर मधून बी.ई (फायर) किंवा फायर टेक्नोलॉजी/फायर इंजीनियरिंग/ सेफ्टी अँड फायर इंजिनियरिंगमध्ये बी.टेक केलेले असावे.
नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर येथून डिविजनल ऑफिसरचा कोर्स केलेला उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी अर्ज करताना सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवरुन फॉर्म डाउनलोड करावा. त्यानंतर चीफ जनरल मैनेजर (CDO&CLO), इंडियन बैंक, कॉर्पोरेट ऑफिस, एचआरएम डिपार्टमेंट, रिक्रूटमेंट सेक्शन, 254-260, अव्वई शनमुगम सलाई,रोयापेट्टा, चेन्नई, पिन-600014, तामिळनाडू यावर पाठवून द्यायचा आहे.



