Saturday, February 24, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर पोलिस भरतीच्या आमिषाने फसवणूक; हुपरीच्या भामट्याला मुंबईत अटक

कोल्हापूर पोलिस भरतीच्या आमिषाने फसवणूक; हुपरीच्या भामट्याला मुंबईत अटक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुंबई पोलिस दलात भरतीच्या आमिषाने पाचगाव व पिरवाडी (ता. करवीर) येथील तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करून पसार झालेल्या हुपरी (ता. हातकणंगले) येथील भामट्याला करवीर पोलिसांनी मुंबईत अटक केली. निखिल चंद्रकांत घोरपडे (वय 26) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.

पत्रकार असल्याचा बहाणा करून संशयिताने पाचगाव, पोवार कॉलनीतील मनोहर पाटील यांचा मुलगा ओंकारला मुंबईत रेल्वे पोलिस दलात भरती करतो, असे सांगून 4 लाख 76 हजार रुपयांना फसविले तसेच पिरवाडी (ता. करवीर) येथील शेखर बाजीराव शेळके यांना मुंबईत पोलिस उपनिरीक्षक पदावरील नियुक्तीचे बनावट आदेशपत्र देऊन 5 लाख 89 हजार 200 रुपये उकळले आहेत.

याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. घोरपडेला फसवणुकीच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी ठाणे येथील कारागृहात केली होती. करवीर पोलिसांनी त्यास कारागृहातून ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -