ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोरोनाच्या ओमायक्रॉन स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आरोग्यविषयक सुविधाही मजबूत केली जात आहे. संभाव्य तिसरी लाट येणार हे गृहीत धरून रुग्णालयांमध्ये बेडस आणि ऑक्सिजन बेडसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविली जात आहे. याशिवाय देशात ठिकठिकाणी चार हजार पीएसए ऑक्सीजन संयंत्र स्थापन केले जात आहेत.
युरोप आणि अमेरिकेत ओमायक्रॉन स्ट्रेनने सध्या धुमाकूळ घातलेला आहे. भारतातही या स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या बाराशेच्या पुढे गेली आहे. भविष्यात तिसरी लाट आलीच तर गतवेळसारखी फजिती होऊ नये, यासाठी केंद्र सरकार आतापासून तयारीला लागले आहे.
त्या दृष्टीने आयुष क्लीनिक बनविण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. दुसरीकडे रेल्वे खात्याकडून कोविड केअर कोच बनवले जात आहेत. एका दिवसात पाच लाखांपर्यंत रुग्ण संख्या हाताळण्याची तयारी सरकार करीत आहे.
तिसरी लाट आल्यास केंद्राची दिवसाला ५ लाख रुग्णांना उपचार देण्याची तयारी
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -