Wednesday, November 12, 2025
Homeमहाराष्ट्र12 आणि 13 नोव्हेंबरला राज्यावर मोठं संकट, मोठा इशारा, अलर्ट जारी, 6...

12 आणि 13 नोव्हेंबरला राज्यावर मोठं संकट, मोठा इशारा, अलर्ट जारी, 6 राज्यामध्ये पुढील 24 तास..

राज्यासह देशात मागील काही दिवसांपासून वातावरण सतत बदलताना दिसत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस बघायला मिळाला तर आता अनेक ठिकाणी गारठा वाढला आहे. बऱ्याच भागात पाऊस देखील सुरू आहे. वातावरणातील बदलामुळे लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. ऐन नोव्हेंबरमध्ये काही भागात प्रचंड कडाक्याची थंडी पडली आहे तर अजूनही काही भागात पाऊस सुरू आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी चंदीगड, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. यासोबतच महाराष्ट्रात देखील थंडी वाढले.

 

राज्यात थंडीची लाट आलेली असतानाच काही भागात पावसाचाही इशारा भारतीय हवामान विभागाने दिला. पावसाचे ढग देशावर कायम आहेत. केरळच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. थंडी पुढील काही दिवसांमध्ये अधिक वाढण्याची शक्यता आहे. धुळे, जळगाव, निफाड, नााशिक, परभणी, जेऊर येथे थंडी अधिक वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात आज हलका ते मध्यम स्वरूपाची पाऊस होईल.

 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सायंकाळी थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. पुण्यात आता 13.4 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानाच्या पाऱ्यात सातत्याने घट होऊ लागल्याने राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे.

 

पुढील काही दिवसांत राज्यातील किमान तापमानाच्या पाऱ्यात 4 ते 5 अंशांची घसरण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात हवामानात बदल होऊ लागला आहे. 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी राज्यातील काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पुढील काही दिवस नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. थंडीचा जोर सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -