राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे लाखो महिलांना लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात महिन्याला 1500 रुपयांची मदत पाठवली जाते. याच पैशांचा महिलांना चांगलाच आधार मिळतो. सध्या राज्य सरकारने सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी संकेतस्थळही देण्यात आले आहे. मात्र ही केवायसी करताना अनेक अडचणी येत आहेत. याच अडचणी दूर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. असे असतानाच आता महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी सर्वच लाडक्या बहिणींना महत्त्वाची माहिती दिली आहे. या माहितीनुसार आता राज्यभरातील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आदिती तटकरे यांनी काय माहिती दिली?
आदिती तटकरे यांनी सध्या सुरू असलेल्या केवायसीच्या प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. लाडके बहीण योजनांमध्ये वेबसाईटमध्ये काही बदल होत आहेत, त्यामुळे वेळ लागत आहे. ज्या महिलेला पती आणि वडील नाही त्यांना केवायसी करता येत नाहीये. हीच अडचण लक्षात घेऊन आता संकेतस्थळात महत्त्वाचे बदल केले जात आहे. या बदलांमुळे आता सर्व महिलांना केवायसी करता येईल. त्यासाठीच हे बदल केल जात आहेत, असे तटकरे यांनी सांगिले आहे.
संकेतस्थळात करण्यात येत आहे बदल
सध्या केवायसी करताना खूप अडचण येत आहे. या तांत्रिक अडचणीवरही तटकरे यांनी भाष्य केले आहे. महिलांना येत असलेली तांत्रिक अडचण लक्षात घेण्यात आले आहेत. सध्या संकेतस्थळात काही बदल करण्यात येत आहेत. हे बदल झाल्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही. लगेच केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
सरकार केवायसीची मुदत वाढवून देणार का?
दरम्यान, केवायसी करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकरच ही केवायसी करण्यासाठी महिला प्रयत्नरत आहेत. सध्ये संकेतस्थळात बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे भविष्यात केवायसी करण्यासाठीची मुदत वाढवली जावी, अशी मागणी केली जात आहे. ही मागणी राज्य सरकार मान्य करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



