गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र ‘बिग बॉस 5’ शोचा विजेता सूरज चव्हाण याच्या लग्नाची चर्चा सुरु होती. शिवाय सोशल मीडियावर लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले. 29 नोव्हेंबर रोजी सूरज याने बायको संजना हिच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली. पण मित्र सूरज याचं लग्न अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिला चांगलंच महाहात पडलं आहे. लग्न झाल्यानंतर जान्हवी हिने रुग्णालयात दाखल झाल्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र जान्हवी हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.
रुग्णालयातील फोटो पोस्ट करत जान्हवी किल्लेकर हिने कॅप्शनमध्ये ‘नजर इज रियल’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी हिच्या पोस्टची चर्चा सुरु आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची स्पर्धक जान्हवी किल्लेकरसुद्धा सूरजच्या लग्नाला उपस्थित होती. जान्हवी हिच्यामुळे सूरजच्या लग्नात एक वेगळी रंगत आली… असं म्हणालयला देखील हरकत नाही…
जान्हवी हिने सूरजच्या लग्नात प्रचंड धम्माल केली. मेहंदी, हळद, साखरपुडा, लग्नाची वरात या सर्व विधींमध्ये जान्हवी सहभागी झालेली. एवढंच नाही तर, सूरज याच्या लग्नात चाहत्यांची गर्दी झाल्यानंतर जान्हवी हिने संतापाली आणि गर्दी कमी करण्याचं सर्वांना आवाहन केलं… पण आता जान्हवी आजारी पडली आहे. तिला ‘कोकिलाबेन धीरूभाई अंबानी’ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
जान्हवी हिची पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. एक नेटकरी पोस्टवर कमेंट करत म्हणाला, ‘लग्नात छान दिसत होतीस म्हणून नजर लागली…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तब्येतीची काळजी घे आता…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘काळजी घे…’, शिवाय अनेकांनी जान्हवी हिला ट्रोल देखील केलं आहे.
जान्हवी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये जान्हवी हिने मुख्य भूमिका साकारली आहे. पण ‘बिग बॉस 5’ नंतर जान्हवी हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर देखील जान्हवी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जान्हवी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.



