Friday, December 12, 2025
Homeतंत्रज्ञानसराकरी कंपनीचं यूजर्सना मोठं गिफ्ट! पब्लिक डिमांडवर पुन्हा एकदा सुरु केला 1...

सराकरी कंपनीचं यूजर्सना मोठं गिफ्ट! पब्लिक डिमांडवर पुन्हा एकदा सुरु केला 1 रुपयांचा फ्रीडम प्लॅन

देशातील सर्वात मोठ्या सरकारी टेलीकॉम सर्विस प्रोवाइडर कंपनी बीएसएनएल यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे.यूजर्सच्या प्रचंड मागणीनंतर कंपनीने आता पुन्हा एकदा त्यांचा 1 रुपयांचा फ्रीडम प्लॅन सुरु केला आहे. यामध्ये 30 दिवसांसाठी फ्री कॉलिंग, डेटासह अनेक फायदे ऑफर केले जात आहेत. BSNLने अधिकृतपणे त्यांच्या एक्स अकाऊंटवर या प्लॅनबाबत माहिती दिली आहे. या पोस्टनंतर यूजर्सनी आनंद व्यक्त केला आहे.

 

संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंगसह नेशनल रोमिंगचा फायदा

 

सरकारी टेलीकॉम कंपनीने पोस्ट शेअर करत सांगितलं आहे की, 1 रुपयांत ट्रू डिजिटल फ्रीडम मिळणार आहे. हा प्लॅन 30 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह लाँच करण्यात आला आहे. बीएसएनएलच्या या 1 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 2GB हाय स्पीड (4जी) डेटा आणि संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंगसह नेशनल रोमिंगचा देखील फायदा मिळणार आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 100 फ्री एसएमएसचा फायदा देखील मिळणार आहे.

 

1 रुपयांत बीएसएनएलचे नवीन सिम

 

BSNL ची नवीन ऑफर यूजर्ससाठी मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. यूजर्स 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या काळात बीएसएनएलच्या या ऑफरचा लाभ घेऊ शकणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ऑफर केवळ नवीन यूजर्ससाठी उपलब्ध आहे. म्हणजेच यूजर्स 1 रुपयांत बीएसएनएलचे नवीन सिम खरेदी करू शकतात आणि कंपनीच्या या जबरदस्त ऑफरचा लाभ घेऊ शकतात. कंपनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये कंफर्म केलं आहे की, ही ऑफर केवळ BSNL च्या नवीन यूजर्ससाठी उपलब्ध आहे. जुन्या यूजर्सना 1 रुपयांत या ऑफरचा लाभ मिळणार नाही.

 

कधी सुरु झाला होता BSNL चा फ्रीडम प्लॅन

 

यापूर्वी 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत BSNL ने फ्रीडम प्लॅनची घोषणा केली होती. या ऑफरमध्ये बीएसएनएलच्या नवीन यूजर्सना 1 रुपयांत सिम खरेदी करण्याची संधी मिळाली होती. यासोबतच या यूजर्सना प्लॅनमध्ये 30 दिवसांची व्हॅलिडीटी देखील ऑफर केली जात होती. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेली 2GB हाय स्पीड डेटा आणि 100 फ्री एसएमएसचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.

 

15 दिवसांसाठी वाढवली फ्रीडम प्लॅनची व्हॅलिडीटी

 

बीएसएनएलने त्यांच्या फ्रीडम प्लॅनची व्हॅलिडीटी 15 दिवसांनी वाढवली होती. म्हणजेच ग्राहत 15 सप्टेंबरपर्यंत हा प्लॅन खरेदी करू शकत होते. यूजर्सच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला होता. म्हणजेच हा प्लॅन 1 ऑगस्टपासून 15 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -