Friday, December 12, 2025
Homeब्रेकिंग₹३००० की ₹१५००; लाडक्या बहि‍णींना डिसेंबरमध्ये किती पैसे मिळणार?

₹३००० की ₹१५००; लाडक्या बहि‍णींना डिसेंबरमध्ये किती पैसे मिळणार?

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात.या योजनेत ऑक्टोबरपर्यंतचे सर्व हप्ते देण्यात आले आहेत. या योजनेत नोव्हेंबरचा हप्ता अजूनही दिलेला नाही. डिसेंबर महिना सुरु झाला आहे. त्यामुळे आता डिसेंबरचा हप्तादेखील कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana November-December Installment)

 

लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न पडला आहे. लाडक्या बहि‍णींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता वेगवेगळा येणार की एकत्र असाही प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यात राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यामुळे आता महिलांना पैसे येणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे.

 

१५०० की ३००० मिळणार? (Ladki Bahin Yojana ₹1500 Or ₹3000 Rupees Reciecve )

 

लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्यात १५०० की ३००० रुपये येणार असं विचारलं जात आहे. विधानसभा निवडणूकीच्या वेळी दोन हप्ते एकत्रित दिले होते. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, सध्या तरी ३००० रुपये देण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीयेत. अनेक महिन्यात हप्ते पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यामुळे १५०० की ३००० रुपये येणार हे पाहणे गरजेचे आहे.

 

केवायसी गरजेचे

 

लाडकी बहीण योजनेत तुम्हाला केवायसी करणे गरजेचे आहे. केवायसी करण्यासाठी तुम्हाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे तुम्हाला केवायसी करायचे आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केले नाही त्यांनी लवकरच करावेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -