वुमन्स वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर आता पुढचा अध्याय लिहिण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारतीय महिला संघाकडून आता अपेक्षा वाढल्या आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली. साखळी फेरीत सलग तीन सामने गमावल्यानंतर थोडी निराशा होती. पण बाद फेरीत स्थान मिळवलं आणि जेतेपदाला गवसणी घातली. आता टीम इंडियाचं पुढचं लक्ष्य टी20 वर्ल्डकप असणार आहे. त्यासाठी आतापासून तयारी सुरु झाली आहे. त्या दृष्टीने आता संघाची बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे भारत श्रीलंका टी20 मालिका ही महत्त्वाची आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. ही मालिका 21 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने 15 खेळाडूंची घोषणा केली आहे. या उपकर्णधार स्मृती मंधानाचं नाव देखील आहे.
वनडे वर्ल्डकप संघातील बहुतांश खेळाडूंचा या संघात समावेश आहे. एखाद दुसऱ्या खेळाडूची या संघात भर पडली आहे. दुसरीकडे, प्रतिका रावल जखमी असल्याने त्यातून सावरलेली नाही. त्यामुळे तिला या संघात स्थान मिळालेलं नाही. भारताच्या 19 वर्षांखालील वुमन्स टी20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग असलेल्या जी. कमलिनी आणि वैष्णवी शर्मा यांना 15 सदस्यीय संघात स्थान मिळालं आहे.
स्मृती मंधाना पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाली आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यात उलथापालथी झाल्यानंतर ती मैदानात उतरणार आहे. त्यामुळे तिच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष्य असणार आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत स्मृतीने धावांचा डोंगर रचला होता. दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली होती. आता पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत कशी कामगिरी करते याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
वुमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, हरलीन देओल, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंह ठाकुर, ऋचा घोष, जी कमालिनी, श्री चरणी आणि वैष्णवी शर्मा.
असे आहेत सामने
भारत श्रीलंका पहिला टी20 सामना 21 डिसेंबर, विशाखापट्टणम
भारत श्रीलंका दुसरा टी20 सामना 23 डिसेंबर, विशाखापट्टणम
भारत श्रीलंका तिसरा टी20 सामना, तिरूवनंतपुरम
भारत श्रीलंका चौथा टी20 सामना, तिरूवनंतपुरम
भारत श्रीलंका पाचवा टी20 सामना, तिरूवनंतपुरम



