Friday, December 12, 2025
Homeइचलकरंजीतारदाळ चोरीप्रकरणी दोघांना अटक; एक दिवसाची कोठडी

तारदाळ चोरीप्रकरणी दोघांना अटक; एक दिवसाची कोठडी

तारदाळ येथे आठ दिवसांपूर्वी झालेल्या 9 तोळे सोने चोरीप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. उदय श्रीकांत माने (वय 29, रा. बेघर वसाहत, यड्राव), प्रल्हाद विठ्ठल कवठेकर (वय 30, रा.

 

तारदाळ) अशी त्यांची नावे आहेत. मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. संशयितांकडून 4.900 ग््रॉम सोने, दुचाकी मोबाईल जप्त केला आहे. परिसरात केलेल्या अनेक चोऱ्या उघड होण्याची शक्यता तपास अधिकारी उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर यांनी वर्तवली आहे.

 

आठ दिवसांपूर्वी ज्ञानेश्वरनगर तारदाळ येथील हरी चोपडे यांच्या बंद घराचे कुलप उचकुटून 5 लाख 76 हजार रुपयांचे सुमारे नऊ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना माने याच्यावर संशय आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदार प्रल्हाद कवठेकर याचे नाव सांगून गुन्ह्याची कबुली दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -