Sunday, September 24, 2023
Homeकोल्हापूरभांडण अशी की, पोलिस अधिकार्‍याच आली चक्‍कर, हाणामारी, दगडफेकीने प्रचंड तणाव

भांडण अशी की, पोलिस अधिकार्‍याच आली चक्‍कर, हाणामारी, दगडफेकीने प्रचंड तणाव

हुपरी येथील त्या जागेच्या मागणीवरून आज पुन्हा जोरदार वाद झाला, या ठिकाणी घातलेल्या झोपड्या एका गटाने पाडून टाकल्याचा आरोप करण्यात आला, याच्या निषेधार्थ दोन महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले त्यामुळे यावेळी आरडा ओरड  झाली. यावेळी  चक्कर आल्याने सपोनि पंकज गिरी हे खाली पडले त्यामुळे वातावरण आणखीनच चिघळले.पोलिस आणि आंदोलनकर्त्यांचा जोरदार आरडाओरडा आणि बघून घेण्याची भाषा यामूळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. सपोनि गिरी यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले तर त्या दोन महिलाना सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हुपरी  हद्दीतील सिटी सर्व्हे नंबर २८८ मधील गट नंबर ९२५/८अ ही जमीन समस्त चर्मकार समाजास दिलेली असताना त्याचा कब्जा मिळाला नाही हा कब्जा मिळावा म्हणून गेल्या सोमवारपासून उपोषण सुरू आहे.दरम्यान आंदोलनकर्त्यानी या जागेवर झोपड्या घातल्यामुळे चर्मकार समाजाच्या दुसऱ्या गटाने त्याला विरोध केला. त्यामुळे जोरदार मारामारी दगडफेक झाली. याप्रकरणी ८० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आंदोलक व दुसरा गट या जागेवर तीन दिवस समोरासमोर ठाण मांडून बसल्याने तणावपुर्ण वातावरण बनले होते.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र