Saturday, July 27, 2024
Homeआरोग्यविषयकहिवाळ्यात मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा!

हिवाळ्यात मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा!

पेरू खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पेरूमध्ये भरपूर फायबर असते. हे रक्तातील साखरेच्या वाढीस प्रतिबंध करते. पेरूमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स देखील आहे. पेरू वजन कमी करण्यासही मदत करते.

दालचिनी हा मसाला आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दालचिनी रक्तातील ग्लुकोज आणि ट्रायग्लिसराइड्स या दोन्हींची पातळी सामान्य करण्यात मदत करते. त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

लिंबू आणि संत्री यांसारखी लिंबूवर्गीय फळे ‘डायबेटिस सुपरफूड’ आहेत. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात समावेश केला पाहिजे. संत्र्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे संत्र्याचे दररोज सेवन करा.

गाजर पोषक तत्वांनी युक्त आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास गाजर मदत करते. गाजराचा ग्लायसेमिक इंडेक्सही खूप कमी असतो. त्यामुळे मधुमेही रुग्ण आपल्या आहारात याचा समावेश करू शकतात.

लवंगमध्ये नायजेरीसिन तत्व असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे इन्सुलिन तयार करण्याची क्षमताही वाढते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -