आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी मिनी लिलावात 359 खेळाडूंवर बोली लागणार आहे. पण त्यापैकी फक्त 77 खेळाडूंनाच भाव मिळेल. मिनी लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. त्याच्यासाठी कोट्यवधींची बोली लागू शकते. या खेळाडूंची जोरदार चर्चा रंगली आहे.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीनसाठी फ्रेंचायझी फिल्डिंग लावतील. कारण आक्रमक फलंदाजीसह वेगवान गोलंदाजीही करतो. त्याने आयपीएलमध्ये 29 सामन्यात 707 धावा केल्या आहेत. तसेच 17 विकेट काढल्या आहेत. मागच्या पर्वात दुखापतीमुळे खेळला नव्हता.
भारताचा अष्टपैलू वेंकटेश अय्यरवर पुन्हा एकदा मोठी बोली लागू शकते. मेगा लिलावात केकेआरने त्याच्यासाठी 23.75 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र मागच्या पर्वात काही खास करू शकला नाही. त्याला केकेआरने रिलीज केलं आहे. तरीही इतर फ्रेंचायझी त्याच्यासाठी बोली लावू शकतात.
इंग्लंडचा अष्टपैलू लियाम लिविंगस्टोनवरही नजर असणार आहे. लियाम हा आक्रमक फलंदाज असून सामना पालटण्याची ताकद ठेवतो. इतकंच काय तर गोलंदाजीही करतो. मागच्या पर्वात आरसीबीला विजयाची चव चाखवण्यात लियामचं योगदान होतं.
भारताचा फिरकीपटू रवि बिश्नोई याच्यासाठी फ्रेंचायझी बोली लावण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने 77 सामन्यात 72 विकेट घेतल्या आहे. त्यामुळे फ्रेंचायजींमध्ये त्याच्यासाठी चढाओढ दिसू शकते.




