Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरचांदोली परिसरात भूकंपाचे दोन धक्के: कोल्हापूर, बेळगाव, सोलापुरातही भूकंप

चांदोली परिसरात भूकंपाचे दोन धक्के: कोल्हापूर, बेळगाव, सोलापुरातही भूकंप



चांदोली परिसरात शनिवारी रात्री भूकंपाच्या दोन धक्क्यांनी हादरला. शनिवारी रात्री 11 वाजून 48 मिनिटांच्या सुमारास चांदोली परिसराला पहिला भूकंपाचा धक्का बसला. वारणावती येथील भूकंपमापन केंद्रावर त्याची तीव्रता 2.8 रिश्टर इतकी नोंदली गेली. हा धक्का अतिसौम्य असल्यामुळे जाणवला नाही, तर लगेचच एक मिनिटाच्या फरकाने 11 वाजून 49 मिनिटांच्या सुमारास दुसरा धक्का बसला.

त्याची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली. सौम्य स्वरूपातील हा धक्का अल्प प्रमाणात जाणवला. या दोन्ही भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावतीपासून दोनशे किलोमीटर अंतरावर होता. या धक्क्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण प्रशासनाने दिला आहे.

कोल्हापूरपासून 18 किलोमीटर केंद्रबिंदू

कोल्हापूरच्या पश्चिम भागासह बेळगाव आणि सोलापूरच्या काही भागांत शनिवारी (दि. 4) रात्री भूकंपाचे सौम्य धक्के बसले. या धक्क्यांची तीव्रता 4 रिश्टर स्केलच्या खालीच होती. त्यामुळे त्यांची तीव्रता जाणवली नाही.

कोल्हापूरच्या पश्चिम भागात 11 वाजून 49 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंपाची तीव—ता 3.9 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली. त्याचा केंद्रबिंदू कोल्हापूरपासून 18 किलोमीटर कळे आणि पणुत्रेच्या मध्ये होता. शहरासह पूर्वेकडील भागात धक्के जाणवले नाहीत. भूकंपाची खोली भूगर्भात 38 किलोमीटर असल्याने त्याचा धक्का सौम्य प्रमाणात जाणवला. कसल्याही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली.

सोलापूर शहरातील काही भागात शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास सौम्य धक्के बसले. त्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल होती. तर कोयना परिसरात रविवारी पहाटे 3 वाजून 21 मिनिटांनी 2.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली. याचा केंद्रबिंदू रत्नागिरी जिल्ह्यातील खोपी गावच्या ईशान्येस 14 कि.मी. अंतरावर होता. याची तीव्रता अत्यंत कमी असल्याने कोणत्याही भागात धक्के जाणवले नसल्याची माहिती कोयनानगर उपकरण विभागीय उपअधिकार्‍यांनी दिली आहे.

अलमट्टी केंद्रावर 3.9 रिश्टरची नोंद

विजापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये शनिवारी मध्यरात्री भूकंपाचे हादरे जाणवले. अलमट्टी येथील भूकंपमापन केंद्रामध्ये धक्क्याची तीव्रता 3.9 रिश्टर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बेळगाव जिल्ह्याच्या काही भागातही हा धक्का जाणवला. बेळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी सौम्य भूकंप झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -