Sunday, December 22, 2024
Homenewsएकाच कुटुंबातील तिघांची गळफास लावून आत्महत्या

एकाच कुटुंबातील तिघांची गळफास लावून आत्महत्या



अहमदनगरमध्ये खळबळजनक बातमी घडली आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास लावून आत्मत्या केली आहे. कर्जाला कंटाळून एवढ्या टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुरूवातीला मुलीला गळफास लावून नंतर पती-पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला आहे.


केडगावमधील मोहिनीनगर भागात राहणारे 45 वर्षीय व्यावसायिक संदीप दिनकर फाटक, 32 वर्षीय किरण संदीप फाटक आणि 10 वर्षीय मैथिली संदीप फाटक हे तिघे घरात गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर आपल्या पथकासह तेथे दाखल झाले आहेत. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.


कोंडीराम वीरकर हे संदीप फाटक यांचे सासरे. केडगाव ही संदीप फाटक यांची सासूरवाडी. केडगावदेवी भागातील ठुबे मळ्यात अलीकडेच ते राहायला गेले होते. कोंडीराम वीरकर हे त्यांचे सासरे होत. रात्री फाटक कुटुंबाचे नातेवाईकांशी दूरध्वनीवरून बोलणेही झाले होते. सकाळी बराच काळ प्रतिसाद न मिळाल्याने शेजारी तसेच सासुरवाडीच्या लोकांनी घरी जाऊन पाहिले असता तिघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. फाटक गेल्या काही काळापासून आर्थिक विवंचनेत होते. त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -