Thursday, December 18, 2025
Homeमहाराष्ट्रKGF २च्या दिग्दर्शकावर कोसळला दु:खांचा डोंगर, 4 वर्षीय मुलाचा मृत्यू

KGF २च्या दिग्दर्शकावर कोसळला दु:खांचा डोंगर, 4 वर्षीय मुलाचा मृत्यू

कन्नड सिनेमातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे KGF. या चित्रपटाने हिंदीसह अनेक भाषांमध्ये रिलीज होऊन जगभरात ओळख निर्माण केली. चित्रपटाशी जोडलेला प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञाचे नावही चर्चेत आले. ‘KGF: चॅप्टर १‘ आणि ‘KGF: चॅप्टर २’ च्या प्रचंड यशाने भारतीय सिनेमाला एक नवे स्थान दिले. विशेषतः दुसऱ्या भागाच्या रिलीजनंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडणारी कमाई केली. तसेच जगभरात चित्रपटाचा डंका वाजला, पण आता याच चित्रपटाशी जोडलेल्या एका महत्त्वाच्या सदस्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळले आहे. ‘KGF: चॅप्टर २’ च्या को-डायरेक्टर किर्तन नाडगौडाच्या 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

 

नेमकं काय घडलं?

ही दु:खद घटना १७ डिसेंबर रोजी घडली. किर्तनचा साडेचार वर्षीय मुलगा सोनारश नाडगौडासोबत घडलेल्या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा अपघात लिफ्टशी संबंधित होता आणि इतका अचानक घडला की कुटुंबाला मुलाला वाचवण्याची संधीही मिळाली नाही. कन्नड प्रभाच्या रिपोर्टनुसार निष्पाप सोनारश लिफ्टमध्ये अडकला होता. तो इतका घाबरला की त्याचा मृत्यू झाला. कुटुंबाच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की ही घटना इतकी भयावह आणि अनपेक्षित होती की आता त्यावर विश्वास ठेवणेही कठीण आहे.

 

पवन कल्याणने व्यक्त केले दु:ख

 

ही दु:खद बातमी समोर येताच कन्नड चित्रपट इंडस्ट्रीसह संपूर्ण दक्षिण भारतीय चित्रपट इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. अनेक कलाकार, तंत्रज्ञ आणि चित्रपट जगताशी जोडलेल्या लोकांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या संवेदना व्यक्त केल्या आणि कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडियावर किर्तन नाडगौडा आणि त्यांच्या पत्नी समृद्धी पटेल यांच्यासाठी संवेदना व्यक्त करताना प्रार्थना केली की ईश्वर त्यांना या अपार दु:खाला तोंड देण्याची शक्ती देवो.

 

किर्तनचा प्रवास

 

किर्तन नाडगौडा यांच्या करिअरविषयी बोलायचे झाले ते गेल्या अनेक वर्षांपासून कन्नड चित्रपट इंडस्ट्रीचा महत्त्वाचा भाग राहिले आहेत. त्यांनी KGF सारख्या ऐतिहासिक चित्रपटांना को-डायरेक्ट केले आणि त्याशिवाय अनेक प्रोजेक्ट्सच्या प्रोडक्शनशी जोडलेले राहिले आहेत. KGF ला कन्नडसह हिंदी आणि इतर दक्षिण भारतीय भाषांमध्येही प्रचंड यश मिळाले होते. त्यांच्या मुलाच्या निधनानंतर सर्वांना धक्का बसला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -