कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, पन्हाळा, मुरगूड, हातकणंगले, कुरुंदवाड आदी नगरपरिषद व नगरपंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील निकाल हाती आले असून अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.
मुरगूडमध्ये मुश्रीफ गटाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांचा प्रभाग क्रमांक ५-अ मधून भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवाराकडून धक्कादायक पराभव झाला. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मंडलिक गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, नगराध्यक्ष पदाच्या शिवसेनेच्या उमेदवार सुहासिनी पाटील या पहिल्या फेरीत ७०६ मतांनी आघाडीवर आहेत.
मुरगूड – पहिल्या फेरीतील प्रभागनिहाय निकाल:
प्रभाग १: महेश धोंडीराम भाडेकर (अपक्ष)
प्रभाग २: प्रियंका मारुती गवळी (शिवशाहू आघाडी) – बिनविरोध
प्रभाग ३: समीना जमीर गारदी (जनस्वराज्य)
प्रभाग ४: मिलिंद माधव कुराडे (भाजप), संज्योती माणिक नायकवडी (भाजप)
प्रभाग ५: तेजस्विनी संजय गुरव (जनसुराज्य), अभिजीत दीपक गायकवाड (जनसुराज्य)
कुरुंदवाडमध्ये यड्रावकर गटाच्या मनीषा डांगे या पहिल्या फेरीत ११८४ मतांनी आघाडीवर आहेत.
शिरोळ नगरपालिका:
शिरोळ नगरपालिकेत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आघाडीच्या असलेल्या शिरोळ येथे नगराध्यक्ष योगिता कांबळे या २१५९ मतांनी आघाडीवर आहेत.
मलकापूर नगरपालिका:
मलकापूरचे माजी नगराध्यक्ष शामराव कारंडे पराभूत झाले. पहिल्या फेरीत जनसुराज्यच्या रश्मी कोठावळे या ४४ मतांनी आघाडीवर आहेत.
हातकणंगले नगरपंचायत:
हातकणंगले येथे काँग्रेसचा पहिला उमेदवार नेहाल सनदी विजयी ठरला.
सात प्रभाग: अमर वरूटे (काँग्रेस) विजयी
प्रभाग ५: महेश पाटील (उबाठा) विजयी
प्रभाग २: गिरीश इंगवले (काँग्रेस) विजयी
प्रभाग ३: सुभाष गोरे (अपक्ष) विजयी
प्रभाग २: सुप्रिया अभिजीत इंगवले (काँग्रेस) विजयी
प्रभाग ११: लुगडे कविता प्रकाश (भाजप) विजयी
सचिन बोराडे (काँग्रेस) विजयी
पहिल्या टप्प्यातील या निकालांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील फेऱ्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





