नमस्कार मित्र मैत्रिणींनो
मित्र मैत्रिणींनो भाग्य बदलायचे असेल तर गुरुवारचे हे उपाय करा. आपल्यापैकी कुणाच्याही कुंडलीमध्ये गुरूच्या संदर्भात कोणतेही दोष असतील तर गुरूला शांत करण्यासाठी गुरूवारच्या दिवशी एक विशेष पूजा केली जाते. बृहस्पति चे ही गुरु आहेत.
गुरु हे वैवाहिक जीवन व भाग्याचे कारक ग्रह आहे. आजच्या या लेखामध्ये आपण गुरु ग्रहाला शांत करण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. हे केल्याने आपल्या वरचे सगळे दोष दूर होणार आहेत. आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुख समाधान लाभणार आहे.
पहिला उपाय गुरूवारच्या दिवशी गुरु ग्रहाचा उपवास धरावा. उपवास करणाऱ्या व्यक्तींनी त्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे. त्यादिवशी आळणी जेवण जेवावे म्हणजेच बिना मीठाचे जेवण जेवायचे आहे कशातही घालायचं नाही.
जेवणामध्ये पिवळ्या वस्तूंचे समावेश करावा. जसे की बेसनाचे लाडू आंबे केळी संत्री इत्यादी पिवळ्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा. एकंदरीतच काय उपवास केलेल्या दिवशी सर्व पिवळट घालायचं आहे. व पिवळ्या वस्तू खायचे आहेत.
दुसरा उपाय म्हणजे बृहस्पतीची प्रतिमा किंवा फोटोला पिवळ्या वस्त्रावर स्थापन करावे. त्यानंतर पंचोपचार पूजा करावी पूजा करत असताना, केशरी चंदन, पिवळे तांदूळ, पिवळे फूल, व प्रसादासाठी पिवळे पंचपक्वान तयार करावेत.
व त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुले देखील ब्रहस्पती यांच्या प्रतिमेला किंवा फोटोला अर्पण करावेत. व आरती करावी. बृहस्पति देवाची प्रतिमा आपल्याला कोणत्याही फोटोच्या दुकानांमध्ये आपल्याला सहज मिळू शकते. किंवा आपण ती ऑनलाईन देखील मागू शकता.
तिसरा उपाय गुरु मंत्राचा सतत जप करावा तो मंत्र असा आहे “ओम ब्रूम ब्रस्प ते नमः” आपल्याला या मंत्राचा जाप 108 वेळा करायचा आहे. ज्यांच्याजवळ जयकुमार नाही, त्या व्यक्तीने घड्याळ्यात पंधरा मिनिटे सतत या मंत्राचा जप करावा. म्हणजे आपला एक माळ पूर्ण होतो.
चौथा उपाय गुरु ग्रहाचा निगडित सर्व पिवळ्या वस्तू गोरगरिबांना दान कराव्यात. त्या वस्तू श्रीमंतांना देऊ नयेत. कारण श्रीमंत व्यक्ती जवळ त्या वस्तू असल्यामुळे त्याचा ते लोक वापर करत नाहीत.
ते त्यांच्याजवळ तसेच पण राहते. पण एखाद्या गरीब व्यक्तीला हे दान केले तर ती व्यक्ती त्याचा पुरेपूर वापर करते. व आपल्याला आशीर्वाद देते.
पिवळ्या वस्तू म्हणजे आपण सोने, पिवळी वस्त्रे, हरभरा, डाळ आंबा, केळी अशा अनेक पिवळ्या रंगाच्या वस्तू किंवा फळे देखील आपण गरीब व्यक्तींना दान करू शकतो व त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतो.
पाचवा उपाय महादेवाला गुरुवारच्या दिवशी बेसनाच्या लाडवाचा प्रसाद अर्पण करावा. हा प्रसाद मंदिरात येणाऱ्या सर्व भक्तमंडळीना वाटून त्यातील थोडा प्रसाद आपल्या घरी घेऊन यावा. व आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी थोडा थोडा खावा. त्यामुळे देवा दी देव महादेव देखील आपल्यावर प्रसन्न होतील, आपल्याला शुभ आशीर्वाद देतील.
मित्रानो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेले आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.




