Sunday, February 15, 2026
Homeइचलकरंजीसांगली रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावला जिल्हाप्रमुख रविंद्र माने : प्रभाग 8...

सांगली रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावला जिल्हाप्रमुख रविंद्र माने : प्रभाग 8 मध्ये महायुतीच्या उमेदवारांना वाढता पाठींबा

इचलकरंजी-सांगली रस्त्यावरील वाढलेली रहदारी, यातून वारंवार घडणारे अपघात, वाहतूक कोंडी, अशा समस्यांवर मात करण्यासाठी या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम प्रामुख्याने पुढाकार घेऊन मार्गी लावले आहे. यासाठी समन्वयातून सांगली वेस मारुती मंदिराचे स्थलांतर व जिर्णोद्धार करुन भव्य दिव्य असे मारुती मंदिर समितीने साकारले आहे. सांगली रोडवरील वाहतूक सुरळीत होऊन येथील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी दिले.

इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग 8 मधील महायुतीचे उमेदवार रविंद्र माने यांच्यासह श्री.पारीसनाथ उर्फ राहुल मल्लू घाट, सौ.रुपा उदय बुगड, सौ.श्वेता मोहन मालवणकर यांनी आमराई रोडवरील ज्ञानेश्वर मंदिरात मतदारांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना जिल्हाप्रमुख रविंद्र माने म्हणाले, प्र्रभागातील मुलभूत प्रश्नांसह या प्रभागातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणून सांगली रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न आम्ही हाताळला आहे. या कामासाठी खा.धैर्यशीलदादा माने, आ.राहुल आवाडे यांचे देखील सहकार्य लाभत आहे. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावू, असे सांगून महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी श्री.पारीसनाथ उर्फ राहुल मल्लू घाट, सौ.रुपा उदय बुगड, सौ.श्वेता मोहन मालवणकर यांनी मतदारांशी संवाद साधला. प्रभागाच्या सर्वांगिण विकासासाठी मतदारांनी निवडून द्यावे, असे आवाहन केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या नजमा शेख, माजी नगरसेवक उदय बुगड, मोहन मालवणकर यांनी आपल्या मनोगतात प्रभागाचा सर्वांगिण विकास हाच ध्यास घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे सुज्ञ मतदारांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देऊन जनसेवेची संधी द्यावी, असे आवाहन केले.

यावेळी जयेश बुगड, अरुण कुंभार, सागर कचरे, फारुक बागवान, असिफ शेख, सादीक बागवान, विनायक काळे, संदीप माने यांच्यासह परिसरातील मतदार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

रविंद्र माने आमच्या हक्काचा माणूस

रविंद्र माने आमच्या हक्काचा माणूस आहे. आमच्या प्रत्येक प्रश्नांसाठी ते सदैव आमच्यासोबत राहिले आहेत. त्यांच्यासह महायुतीच्या सर्वच उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार बैठकीत मतदारांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -