Saturday, January 10, 2026
Homeमहाराष्ट्रइयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची १५ एप्रिलपूर्वी अंतिम सत्र परीक्षा; पाचवी- आठवीच्या...

इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची १५ एप्रिलपूर्वी अंतिम सत्र परीक्षा; पाचवी- आठवीच्या विद्यार्थ्यांची २६ एप्रिल आणि चौथी- सातवीची २६ एप्रिलला शिष्यवृत्ती परीक्षा

इयत्ता चौथी व सातवी आणि इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची २२ फेब्रुवारी रोजी आणि चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी होणार आहे.

 

मागील वर्षीपासून शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात घेतली जात आहे. पण, शिष्यवृत्ती परीक्षेमुळे चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा १५ एप्रिलपूर्वीच पार पडणार आहे.

 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इयत्ता पाचवी व आठवीतील सुमारे नऊ हजार ५९५ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसले आहेत. तर चौथी आणि सातवीतील सुमारे २१ हजार विद्यार्थी परीक्षेला बसतील, असा अंदाज आहे. त्या विद्यार्थ्यांना २ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर मात्र २८ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना विलंब, अतिविलंब व अति विशेष विलंब शुल्क मोजावे लागणार आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून भरले जाणार आहे. यंदा चार वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा होणार असल्याने जिल्हा परिषदेला ५० लाख रुपये द्यावे लागणार आहेत.

 

सेस फंडातून परीक्षा शुल्क

 

इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला तर चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी होणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क जिल्हा परिषदेकडून भरले जाईल. तसेच चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिलअखेर असल्याने तत्पूर्वी त्यांची शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा पार पडेल.

 

– कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

 

दोन पेपर, सात माध्यम अन्‌ बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न

 

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दोन पेपर असतात. पहिल्या पेपरमध्ये प्रथम भाषा व गणित आणि दुसऱ्या पेपरमध्ये तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी असते. दोन्ही पेपर प्रत्येकी १५० गुणांचे असतील. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. ही परीक्षा मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, तेलगू व कन्नड या माध्यमातून होतील. परीक्षेत मेरिटमध्ये आलेल्या चौथीतील विद्यार्थ्यांना तीन वर्षे दरवर्षी पाच हजार रुपये आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना तीन वर्षे साडेसात हजार रुपयांची शिष्यवृत्ती शासनाकडून दिली जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -