केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी, रविवार रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करणार आहेत.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामकाज समितीने (सीसीपीए) बुधवारी संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रमुख तारखांना मान्यता दिली आहे.
तर न्यूज१८ ने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, संसदीय दिनदर्शिकेनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी, रविवार रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करतील. खरंतर अलिकडच्या काळातील हा पहिल्याच केंद्रीय अर्थसंकल्प असेल जो रविवारी सादर केला जाणार आहे.
या आधी २८ फेब्रवारी १९९९ रोजी वाजपेयी सरकारच्या काळात अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी रविवारी अर्थसंकल्प सादर केला होता. त्या दिवशी अर्थसंकल्पाची वेळ देखील बदलण्यता आली होती. जुनी परंपरा मोडत त्यावेळी अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर केला गेला होता. त्याआधी अर्थसंकल्पहा सायंकाळी पाच वाजता सादर व्हायचा.
हे दुर्मिळ होते, कारण रविवारी संसदेची सत्रे फार क्वचितच असतात. मात्र राष्ट्रीय महत्त्वासाठी सुट्टी बदलली गेली. तेव्हापासून, १ फेब्रुवारी ही निश्चित तारीख झाली. यानंतर अर्थसंकल्प शनिवारीही सादर केला जात होता, परंतु केवळ १९९९ मध्येच रविवारी तो सादर करण्यात आला होता आणि आता थेट २०२६मध्ये तेच होणार आहे.



