केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार दमदार कामगिरी करत आहे. इचलकरंजी महापालिकेतही महायुतीचा झेंडा फडकवून उद्योगनगरी असलेल्या इचलकरंजी शहराच्या विकासाची दारे खुली करुया, असे आवाहन महायुतीचे उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी केले.
प्रभाग क्रमांक 8 मधील महायुतीचे उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने, पारीसनाथ उर्फ राहुल घाट, सौ.रुपा बुगड, सौ.श्वेता मालवणकर यांच्या प्रचारार्थ मदनलाल बोहरा मार्केट हौसिंग सोसायटी येथे प्रचार फेरी काढण्यात आली. याप्रसंगी माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आ.सुरेशराव हाळवणकर, मदनलाल बोहरा मार्केट हौसिंग सोसायटीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना रविंद्र माने म्हणाले, प्रभागातील रस्ते, गटारी, दीवाबत्ती, ड्रेनेज अशी विविध विकास कामे मार्गी लावण्यात आली आहेत. यासाठी विविध योजनेतून कोट्यवधींचा निधी प्राप्त करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. बोहरा मार्केट लगत असलेल्या ओढ्यावरील पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देऊन हे काम तातडीने मार्गी लावू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
प्रारंभी बोहरा मार्केट येथील बालाजी मंदिरात दर्शन घेऊन प्रभाग 8 मधील महायुती उमेदवारांच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात आली. या पदयात्रेला परिसरातीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी माजी मंत्री प्रकाश अावाडे, माजी आ.सुरेशराव हाळवणकर यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच वस्त्रोद्योगाशी निगडीत प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्यातील सरकार प्रयत्नशील असून प्रभागाच्या सर्वांगिण विकासासाठी महायुतीचे उमेदवार नेहमीच पुढाकार घेतील. यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन केले.
याप्रसंगी ललीत झंवर, दीपक तिवाडी, सूर्यप्रकाश व्याज, पन्नालाल बेदमुथा, निहालचंद तोष्णीवाल, जितेंद्र जैन, गोविंद चांडक, राजू महाराज, सुरेश झंवर, लालाजी चौधरी, सतिश गौड, गौतम शेटजी, श्रेयस गठ्ठाणी, माजी उपनगराध्यक्ष उदय बुगड, माजी नगरसेवक इकबाल कलावंत, माजी नगरसेवक सचिन हुक्कीरे, मोहन मालवणकर, राजेश मालवणकर, श्रेणिक मगदूम, फारुक बागवान, अरुण कुंभार, अरविंद शर्मा, शफिक बागवान, सचिन वरपे आदी उपस्थित होते.



