Saturday, January 10, 2026
Homeमहाराष्ट्रFlipkart Republic Day 2026 सेल या तारखेपासून होणार सुरु, आयफोनसह हे 5G...

Flipkart Republic Day 2026 सेल या तारखेपासून होणार सुरु, आयफोनसह हे 5G फोन स्वस्तात करु शकाल खरेदी

जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ई-कॉमर्स कंपनी Flipkart त्यांच्या पहिल्या मोठ्या सेलची, Flipkart Republic Day 2026 ची तारीख जाहीर केली आहे.

 

कंपनीच्या टीझरनुसार, हा मेगा सेल 17 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे. कंपनीने अद्याप हा सेल किती दिवसांसाठी असेल याबाबत माहिती दिलेली नाही. पण फ्लिपकार्टच्या वेबसाइट आणि मोबाईल अॅपवर प्रजासत्ताक दिनाच्या सेलसाठी एक समर्पित बॅनर देखील लाईव्ह करण्यात आला आहे. या सेलमध्ये केवळ मोबाईल फोनच नाही तर लॅपटॉप आणि इतर वस्तूंवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे.

 

Plus आणि Black मेंबर्संना प्राधान्य

 

कंपनीचे म्हणणे आहे की फ्लिपकार्ट प्लस आणि ब्लॅक सदस्यांना नियमित वापरकर्त्यांपूर्वी २४ तास आधी सेलमध्ये प्रवेश मिळेल. सेल दरम्यान, वापरकर्त्यांना फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने केलेल्या खरेदीवर दररोज ५% पर्यंत कॅशबॅक मिळेल. बजाज फिनसर्व्ह इन्स्टा ईएमआय कार्ड वापरकर्त्यांना निवडक उत्पादनांवर ४०० रुपयांपर्यंत सूट देखील मिळेल.

 

iPhone आणि Samsung फोनवर सूट

 

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने अद्याप डील आणि अधिकृत ऑफर उघड केलेल्या नसल्या तरी, अहवालानुसार सेलमधील सर्वात मोठी सूट Apple च्या iPhone 16 आणि Samsung च्या Galaxy S25 वर डिस्काउंट असू शकते.

 

बजेट आणि मिड-रेंज फोनवर डिस्काउंट

 

या सेलमध्ये केवळ प्रीमियम स्मार्टफोनच नाही तर Poco आणि Realme सारख्या ब्रँडचे बजेट आणि मिडरेंज स्मार्टफोन देखील उपलब्ध असतील. Flipkart वर एक्सक्लुझिव्ह नथिंग स्मार्टफोन जसे की Phone (2a), Phone (3a) आणि CMF Phone (2) Pro वर देखील सर्वाक जास्त ऑफर्स मिळण्याची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -