Tuesday, January 13, 2026
Homeअध्यात्मयंदाच्या संक्रांतीचे वाहन कोणते? कोणते वस्त्र घातले आहे? ही संक्रांत शुभ आहे...

यंदाच्या संक्रांतीचे वाहन कोणते? कोणते वस्त्र घातले आहे? ही संक्रांत शुभ आहे की अशुभ? मुहूर्त कोणता आहे?

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, यंदाच्या संक्रांतीचे वाहन कोणते कोणते वस्त्र घातले आहे आणि ही संक्रांत शुभ आहे की अशुभ हे आपण आताच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. मकर संक्रांति दिवशी सगळीकडेच वातावरण अगदी आनंदाचे व प्रसन्नतेचे असते. भांडण-तंटा तसेच उणे दूने बोलणे या दिवशी प्रत्येक जण टाळत असतात. आपापसातील नातेसंबंध अधिक मजबूत बनवण्यासाठी मकरसंक्रांतीचा दिवस खूपच शुभ मानला जातो.

मित्रांनो मकर संक्रांतिला शनीचा दिवस देखील मानला जातो. या दिवशी सूर्य आपला मुलगा शनि याला भेटतो. या दिवशी शुक्राचा उदय देखील होतो.अनेक बदल या दिवशी होतात. त्यामुळेच मकर संक्रांति ची उत्सुकता ही प्रत्येकालाच असते. मकर संक्रांतीचे वाहन कोणते आहे? तसेच ही संक्रांत शुभ आहे की अशुभ, वस्त्र कोणते परिधान केलेले आहे? याविषयीची उत्सुकता महिलांना खूपच लागलेली असते. तर मित्रांनो या विषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो जाणून घेऊया शुभ मुहूर्त कोणता आहे.

यावर्षीच्या मकरसंक्रांतीचे वाहन वाघ आहे तसेच उपवाहन अश्व आहे. तिच्या हातात गदा रुपी शस्त्र आहे. ती पूर्व दिशेकडे जात आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र घातलेले आहे. मकर संक्रांतीचा मुहूर्त 14 जानेवारी दिवशी पुण्यकाळ वेळ हा दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी सुरू होऊन तो संध्याकाळी पाच वाजून 45 मिनिटांपर्यंतआहे. या वेळची मकर संक्रांति ही सर्वांसाठीच शुभ आहे. सर्वांचेच कल्याण करणारी आहे. परंतु फक्त आपल्या मेहनतीची परीक्षा घेतली जाणार आहे.

त्यामुळे आपल्या मनात असणाऱ्या नकारात्मक गोष्टी आपण दूर ठेवल्या पाहिजेत. जेणेकरून येणारी मकर संक्रांति आपल्यासाठी खूपच आनंद देणारी ठरेल. येणारे सर्व दिवस आपल्यासाठी खूपच शुभकारक ठरणार असे मनोमन बाळगून मकरसंक्रांतीचा सण अगदी उत्साहाने साजरा करायचा आहे.

मित्रांनो हि माहिती अनेक स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि माहिती शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -