Sunday, November 3, 2024
Homeकोल्हापूरसंजय तेलनाडेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

संजय तेलनाडेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर पोलीस दलाने पुण्यात नाट्यमयरित्या बेड्या ठोकलेल्या इचलकरंजी येथील एसटी सरकार टोळीचा म्‍होरक्‍या, माजी नगरसेवक संजय तेलनाडे याला न्यायालयाने आज (रविवार) पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. फरार असलेल्या सुनील तेलनाडे याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणची विशेष पथके मुंबई-पुण्यासह कर्नाटकात रवाना झाली आहेत.

अडीच वर्षापासून कोल्हापूर पोलिसांना गुंगारा देत असलेल्या आणि राजकीय आश्रयाने सोकावलेल्या एसटी सरकार गँगचा म्‍होरक्या संजय तेलनाडे याला स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, सहाय्यक निरीक्षक किरण भोसले आणि त्यांच्या पथकाने नाट्यमयरित्या जेरबंद केले होते. आज सकाळी तेलनाडेला इचलकरंजी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्‍यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तेलनाडेच्या समर्थकांनी न्यायालयाच्‍या आवारात गर्दी केली होती. पोलिसांनी मोबाइल शूटिंगदारे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करताच समर्थकांनी पळ काढला. सुनील तेलनाडेला पुण्यात जाऊन बेड्या ठोकणाऱ्या पथकातील अधिकारी पोलिसांना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी 35 हजार रुपयाचे बक्षीस घोषित केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -