सूर्यनगर परिसरातील शेतकरी केदारी बाळकृष्ण सूर्यवंशी यांनी एकरात 158 टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. साडेआठ एकरात येथील नेचर केअर फर्टीलायझरची उत्पादने वापरून आडसाली उसाची लागण केली आणि हे विक्रमी उत्पादन घेतले आहे.
तब्बल 40 पासून 78 पर्यंतच्या कांड्यांचा ऊस त्यांच्या शेतात आहे. विट्यातील जयदेव बर्वे यांच्या नेचर केअर फर्टिलायझरच्या मार्गदर्शनाने ही किमया साध्य झाल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.
सूर्यवंशी यांचे साडेआठ एकर ऊस क्षेत्र आहे. ठिबक सिंचन पद्धतीने त्यांनी खते आणि पाण्याचे व्यवस्थापन केले आहे. साडेचार फुटी सरी ठेवून लागण केली आहे. दीड फुटांवर 86-0-32 या वाणाच्या उसाची आडसाली लागण केली होती.
त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ सुरेश माने आणि नेचर केअर फर्टिलायझरचे बर्वे यांच्या टीमने वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक मात्रेला अधिकची जोड देत त्यांनी 14 महिन्यांपर्यंत उसाला लागवड घातली आहे. सूर्यवंशी म्हणाले, नेचर केअर फर्टिलायझर कंपनीने उत्पादित केलेली ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खते वापरली. कंपनीच्या मार्गदर्शनानुसार नेचर केअरची ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खते, अन्नद्रव्ये आणि जैविक खते दिली.