Friday, January 23, 2026
Homeमहाराष्ट्रसायकल खेळताना मांजा गळ्यात अडकला; अवघ्या 15 सेकंदात आठ वर्षीय चिमुकल्याचा जागीच...

सायकल खेळताना मांजा गळ्यात अडकला; अवघ्या 15 सेकंदात आठ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

मकरसंक्रांतीच्या काळात पतंग उडवण्याचा उत्साह शिगेला असतो. मात्र, यादरम्यान पतंगाच्या चायनीज मांजामुळे अनेक अपघातही घडतात. अशाच प्रकारची घटना गुजरातच्या सूरत शहरातून समोर आली आहे.

 

चायनीज मांज्याच्या विळख्यात सापडून 8 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

 

सायकल चालवतना मांजात अडकला…

 

ही घटना 15 जानेवारी रोजी सूरतमधील जहांगीरपूरा परिसरातील आनंद विला रेसिडेन्सी येथे घडली. येथील रहिवासी अमोल बोरसे यांचा 8 वर्षीय मुलगा रेहान याचा या घटनेत मृत्यू झाला. रेहान आपल्या सोसायटीत मित्रांसोबत सायकल चालवत होता. यावेळी अचानक चायनीज मांजा त्याच्या गळ्यात अडकला.

 

CCTV फुटेजमध्ये थरकाप उडवणारे दृश्य

 

व्हिडीओमध्ये दिसते की, रेहान सायकल चालवत असताना अचानक थांबतो. गळ्यात अडकलेला मांजा काढण्याचा प्रयत्न करतो, मात्र अवघ्या 15 सेकंदांतच त्याचा गळा गंभीररीत्या कापल्याने त्याचा जागीच मृत्यू होतो.

 

कर्नाटक- उत्तर प्रदेशात अशाच प्रकारच्या घटना

 

दरम्यान, अशाच प्रकारचा अपघात कर्नाटकातही घडला आहे. ही घटना चितगुप्पा तालुक्यातील तालामडगी गावाजवळ घडली. संजय कुमार होसानमणी (वय 48) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते बिदर तालुक्यातील बंबुळगी गावचे रहिवासी होते. संजय कुमार मकरसंक्रांतीनिमित्त आपली मुलगी हॉस्टेलमधून घरी आणण्यासाठी हुमनाबाद येथे दुचाकीने जात होते. यादरम्यान, अचानक त्यांच्या गळ्यात चायनीज मांजा अडकून गळा गंभीररीत्या कापला गेला आणि जागीच मृत्यू झाला.

 

उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये आपल्या बाइकवरुन घरी परतणाऱ्या फिजिओथेरपिस्ट डॉ. समीर हाश्मी यांचा रस्त्यावर लटकलेल्या चायनीज मांजामुळे गळा कापला जाऊन मृत्यू झाला. ही दुःखद घटना लाइन बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पचहटिया-आझमगढ महामार्गावर घडली. रस्त्यावर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. स्थानिक रहिवाशांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

चायनीज मांज्याचा धोका पुन्हा अधोरेखित

 

उघडपणे विकल्या जाणाऱ्या या प्राणघातक चायनीज मांजामुळे यापूर्वीही अनेकांचा बळी गेला आहे. या घटनांमुळे पुन्हा एकदा चायनीज मांजाच्या धोक्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक राज्यांत चायनीज मांज्यावर बंदी असतानाही त्याचा सर्रास वापर होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -