Friday, January 23, 2026
Homeमहाराष्ट्रराक्षस व्हायचा माझा बाप…, दारूच्या नशेत पोटच्या १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

राक्षस व्हायचा माझा बाप…, दारूच्या नशेत पोटच्या १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

मध्य प्रदेशच्या खंडवामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली.(monster) याठिकाणी १५ वर्षांच्या मुलीवर वडिलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी मुलीला मारून टाण्याची धमकी देत होता त्यामुळे मुलगी ऐवढी घाबरली होती की तिने कुणालाच काही सांगितले नाही. आईला दोन्ही कानांनी ऐकायला येत नसल्यामुळे पीडित मुलगी आईला देखील आपलं दु:ख सांगू शकत नव्हती.शेवटी धाडस करत या मुलीने घरी आलेल्या एका नातेवाईक महिलेला आपल्यासोबत घडलेल्या भयंकर घटनेची माहिती सांगितली. त्यानंतर ही महिला पीडित मुलीला घेऊन पोलिस ठाण्यात गेली तेव्हा हे प्रकरण समोर आले. पोलिसांनी आरोपी नराधम बापाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

 

पीडित मुलीने तक्रारीत सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी नोव्हेंबर २०२५ ला तिचा बाप घरी आला.(monster) त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तू जर कुणाला काही सांगितले तर तुझी हत्या करेल अशी धमकी दिली. ती प्रचंड घाबरली होती. आईला ऐकू येत नसल्यामुळे ती तिला देखील सांगू शकत नव्हती. तिला भीती वाटत होती की कुणाला सांगितले तर बाप तिला मारून टाकेल. तिच्या घरी नातेवाईक आले होते. तेव्हा तिने एका महिलेला वडिलांनी बलात्कार केल्याचे सांगितले.

 

पीडित मुलीला आणखी एक बहीण आहे ती आठवीत शिकते.(monster) मुलगी अभ्यासात हुशार आहे. तिच्या बापाला दारू पिण्याची सवयी आहे आणि तो गांजाचे सेवन देखील करतो. दारूसाठी त्याने आपली शेती विकून टाकली. मुलीला शिक्षण सोडायला लावले. आरोपी दारू प्यायल्यानंतर मुलगी आणि बायकोसोबत राक्षसी कृत्य करायचा. त्यांना मारहाण करायचा. पोलिसांनी आरोपीला अटक केली. कोर्टाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -