Monday, March 4, 2024
Homeक्रीडाफुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला काेराेनाची लागण

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला काेराेनाची लागण

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याला काेराेनाची लागण झाली आहे. मेस्सीसह पॅरिस सेंट जर्मेन (PSG) च्या इतर ३ खेळाडू देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. खुद्द फुटबॉल क्लबने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

लिओनेल मेस्सीला काेराेनाची लागण झाल्‍याची माहिती मिळताच त्‍याच्‍या चाहत्‍यांमध्‍ये खळबळ उडाली आहे. मेस्‍सी लवकर बरा व्‍हावा, अशी प्रार्थना त्‍याच्‍या चाहते करत आहे. मेस्सीसह संघातील कोरोनाबाधित खेळाडू सध्या विलगीकरणात असून त्यांची योग्य ती काळजी मेडीकल टीम घेत असल्याचं पॅरिस सेंट जर्मन क्लबने (PSG) सांगितलं आहे.

मागील वर्षी मेस्सीला सातव्यांदा फुटबॉलमधील सर्वोकृष्ट पुरस्कार बॅलन डी ऑरने सन्मानित करण्यात आले होते. तसेच गेल्यावर्षी अर्जनटिनाने कोपा अमेरिका हा चषक मेस्सीने आपल्या देशासाठी जिंकला होता. मेस्सी हा जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. पॅरिस कडून खेळण्याआधी तो स्पेनमधील बार्सिलोना क्लब कडून खेळत होता.

मेस्सीसह जुआन बर्नेट, सर्जिओ रिको, नॅथन बिटुमाझाला यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -