Monday, February 26, 2024
Homeसांगलीसांगलीत ओमिक्रोनचे २ रुग्ण आढळले

सांगलीत ओमिक्रोनचे २ रुग्ण आढळले

ताजी बातमी ऑनलाईन टीम


मिरज वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना सांगलीकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. गेल्या आठवड्याभरामध्ये सांगली शहर व परिसरात कोरोना रुग्ण संख्याही हळूहळू वाढू लागली होती. त्यात आता भरीसभर २ ओमायक्रोनचे रुग्ण आढळल्याने शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सांगली शहरातील गुलाब कॉलनी या परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याचा ऑमिक्रॉनचा अहवाल आज पॉझिटिव आला. दोन ऑमिक्रॉनचे रुग्ण आढळल्याने मनपा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दाम्पत्याची स्थिती स्थिर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले आहे. मनपा प्रशासनाने देखील या बाधित दाम्पत्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -