Tuesday, February 10, 2026
Homeतंत्रज्ञानJio की Airtel? 859 रूपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये कोणती कंपनी देतेय जास्त डेटा...

Jio की Airtel? 859 रूपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये कोणती कंपनी देतेय जास्त डेटा व वैधता, जाणून घ्या

आपल्यापैकी बरेच लोक त्यांच्या ड्युअल-सिम फोनमध्ये दोन टेलिकॉम कंपन्यांचे सिम कार्ड वापरतात. तुम्ही सुद्धा जिओ आणि एअरटेल कंपनीचे सिमकार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तर दोन्ही कंपन्यांचे प्रीपेड सिम कार्ड वापरणाऱ्यांसाठी कोणती कंपनी जास्त फायदे देते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच जिओ आणि एअरटेल या कंपनीच्या एकाच किंमतीच्या प्रीपेड प्लॅनची तुलना करणार आहोत ज्याची किंमत 859 रूपये आहे. तर वापरकर्त्यांना या समान किमतीच्या रिचार्ज प्लॅनमध्ये कोणती कंपनी जास्त डेटा आणि वैधता तसेच फायदे देते ते आपण आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

 

कंपनी 859 रुपयांमध्ये दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देते. या प्लॅनसोबतच कंपनी काही अतिरिक्त फायदे देखील प्रदान करते.

 

जिओच्या 859 रूपयांच्या प्लॅनची वैधता

जिओच्या या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे, म्हणजेच दररोज 2 जीबी डेटावर, हा प्लॅन तुम्हाला एकूण 168 जीबी डेटा देईल. या प्लॅनमध्ये काही अतिरिक्त फायदे देखील आहेत, जसे की मोफत 50 जीबी क्लाउड स्टोरेज, तीन महिने जिओ हॉटस्टार मोबाईल/टीव्ही अॅक्सेस आणि 35,100 रुपयांचा 18 महिन्यांचा गुगल जेमिनी प्रो प्लॅन.

 

एअरटेलच्या 859 रूपयांच्या प्लॅनची माहिती

 

एअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो, पण 2 जीबी नाही. अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये काही अतिरिक्त फायदे देखील मिळतात.

 

एअरटेलच्या 859 रूपयांच्या प्लॅनची वैधता

 

जिओ प्रमाणेच एअरटेलचा हा प्रीपेड प्लॅन देखील 84 दिवसांच्या वैधतेसह येतो, परंतु 1.5 जीबी दैनिक डेटासह, हा प्लॅन तुम्हाला एकूण 126 जीबी डेटा देतो. याचा अर्थ असा की हा प्लॅन किंमतीत जिओशी तुलनात्मक आहे, त्यात जिओपेक्षा 42 जीबी कमी डेटा यामध्ये मिळतो.

 

अतिरिक्त फायद्यांमध्ये 4000 किमतीचे 12 महिने मोफत अ‍ॅडोब एक्सप्रेस प्रीमियम, स्पॅम अलर्ट आणि महिन्यातून एकदा मोफत हॅलोट्यून यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -