Wednesday, September 27, 2023
Homeकोल्हापूरधर्मशाळेत प्रेमी युगुलाचा गळफास, चार आयुष्यं उद्ध्वस्त

धर्मशाळेत प्रेमी युगुलाचा गळफास, चार आयुष्यं उद्ध्वस्त

अहमदनगर जिल्ह्यातील प्रेमी युगुलाने कोल्हापुरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधांना विरोध केल्याने त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे तरुणीचं लग्न झालं असून तिला मुलगाही असल्याची माहिती आहे. राहुल मच्छे आणि प्रियंका भराडे अशी आत्महत्या करणाऱ्या प्रेमी युगुलाची नावं आहेत.

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराजवळ एका धर्मशाळेत दोघांनी गळफास घेऊन आयुष्याची अखेर केली. दोघांच्या मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडल्यामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला. दोघांच्या आत्महत्येमुळे प्रियकर, विवाहित प्रेयसी, तिचा पती आणि मुलगा अशी चौघांची आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं बोललं जात आहे.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र