डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी 20-20-20 चा नियम पाळा. दर 20 मिनिटांनी ब्रेक घ्या आणि 20 फूट दूर वर पहा आणि सुमारे 20 सेकंद हे करा. यामुळे सतत जरी आपण लॅपटाॅपवर काम करत असतोल तरी देखील आपल्या डोळ्यांना ताण येणार नाही.
अनेकदा लोक काम करताना बोटांनी डोळे चोळतात, असे केल्याने डोळ्यांना इजा होतेच, त्याचबरोबर त्वचेवर घाणही साचते. यामुळे कधीही काम करताना डोळे चोळू नका.
सतत तासनतास काम केल्यामुळे डोळे दुखू लागतात, अशा स्थितीत काकडीचे काप काही वेळ डोळ्यांवर ठेवा.स्क्रीनसमोर काम केल्यानेही डोळ्यांखाली काळी वर्तुळे येऊ शकतात. यासाठी बटाट्याचा रस डोळ्याभोवती लावा.