Thursday, April 2, 2026
Homeआरोग्यरात्री घाम येणे, घशात प्रचंड खवखव; सिकाडा व्हायरस 23 देशात पसरला, 'भयानक'...

रात्री घाम येणे, घशात प्रचंड खवखव; सिकाडा व्हायरस 23 देशात पसरला, ‘भयानक’ लक्षणे वाचून शास्त्रज्ञही चक्रावले, भारतावरही संकट?

कोरोना विषाणू संपण्याच्या उंबरठ्यावर असताना पुन्हा एखादा नवीन व्हेरिएंट समोर येतो आणि वेगाने पसरण्यास सुरुवात करतो. गेल्या काही आठवड्यांपासून जगभरात ओमिक्रॉनचा नवीन सब-व्हेरिएंट BA.3.2 वेगाने पसरत आहे.

 

दक्षिण आफ्रिकेत प्रथम ओळख झाल्यानंतर हा व्हेरिएंट आता अमेरिका आणि युरोपसह जगातील सुमारे 23 देशांमध्ये पसरला आहे. हेल्थ एक्सपर्ट्सनी या नव्या व्हेरिएंटला ‘सिकाडा (Cicada)’ असे नाव दिले आहे.

 

या सिकाडा व्हेरिएंटचे सर्वात धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये आढळणाऱ्या म्युटेशनची मोठी संख्या आहे. यामध्ये सुमारे 70 ते 75 म्युटेशन आढळले आहेत ज्यामुळे तो आधीच्या सर्व व्हेरिएंटपेक्षा अधिक संसर्गजन्य असू शकतो.

 

म्युटेशन आणि परिणाम

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार सिकाडा व्हेरिएंटमधील बहुतांश म्युटेशन हे त्याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये आहेत. वैज्ञानिकांचे मत आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात म्युटेशन असल्यामुळे हा व्हेरिएंट सध्याच्या लसींचा प्रभाव काही प्रमाणात कमी करू शकतो. अमेरिकेतील 25 राज्यांमध्ये या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असून, विमानतळांवरील वेस्ट वॉटर आणि प्रवाशांच्या नमुन्यांमध्ये त्याची पुष्टी झाली आहे. याच कारणामुळे या व्हेरिएंटला “Variant Under ” या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

 

मात्र सध्या दिलासा देणारी बाब म्हणजे या व्हेरिएंटमुळे गंभीर आजार किंवा गुंतागुंतीची प्रकरणे फारशी आढळलेली नाहीत. बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणे दिसत आहेत आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढलेले नाही.

 

सिकाडा व्हेरिएंटची लक्षणे

या व्हेरिएंटची लक्षणे बहुतांश ओमिक्रॉनसारखीच आहेत. संक्रमित व्यक्तींमध्ये खालील लक्षणे दिसून येतात.

 

1)घशात खवखव (सर्वाधिक सामान्य)

2)तीव्र थकवा

3)ताप

4)खोकला

5)अंगदुखी

 

काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये

 

1)रात्री घाम येणे

2)त्वचेवर पुरळ किंवा चट्टे

3)चव किंवा वास जाणे

 

जर अशी लक्षणे जाणवली तर तात्काळ तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

 

भारतामधील स्थिती

भारतामध्ये सध्या या सिकाडा व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळलेला नाही त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे हा व्हेरिएंट देशात येऊ शकतो म्हणून खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते भारतातील मोठ्या लोकसंख्येला लसीकरण झालेले असल्यामुळे गंभीर आजारापासून संरक्षण मिळू शकते. सध्याच्या लसी अजूनही गंभीर आजार आणि मृत्यूचा धोका कमी करण्यात प्रभावी आहेत.

 

कशी घ्याल काळजी?

 

1)गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

2)बाहेर जाताना मास्क वापरा

3)हात वारंवार स्वच्छ धुवा

4)लक्षणे दिसताच त्वरित चाचणी करा

 

सतर्कता आणि योग्य खबरदारी घेतल्यास कोणत्याही नव्या कोरोना व्हेरिएंटचा धोका कमी करता येऊ शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -