Tuesday, May 19, 2026
Homeमहाराष्ट्रमोठं संकट, प्रशासनाकडून थेट निर्णय, 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, तब्बल..

मोठं संकट, प्रशासनाकडून थेट निर्णय, 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, तब्बल..

राज्यात सुर्य आग ओकत आहे. उष्णतेचा मोठा कहर बघायला मिळतोय. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यावर दुहेरी संकट आहे. उष्णतेसोबतच अवकाळी पावसाचे संकट उभे आहे. देशातील अनेक भागात पावसाने मोठा कहर केला. त्यामध्येच आज मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. 45 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान जाऊ शकते. यामुळे नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 यादरम्यान घराबाहेर पडणे टाळावे. वर्धा आणि अकोला येथे काल 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. अमरावती, अकोला, परभणी, हिंगोली, नागपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. प्रशासनाकडून काही सूचना नागरिकांना देण्यात आल्यात.

 

जळगाव जिल्ह्यासह चाळीसगाव तालुक्यात उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत असून, चाळीसगावातील तापमानाने यावर्षी दुसऱ्यांदा उच्चांक गाठत तब्बल 43 अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली आहे. सकाळपासूनच कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळेत उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होत आहेत. वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांसह शेतकरी, मजूर आणि वाहन चालकांनाही बसत आहे.

 

उष्माघाताचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे आणि लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने देखील येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

 

राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्र हा उष्णतेच्या धोक्याच्या दृष्टीने संवेदनशील राज्यांपैकी एक असल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भारतीय हवामान विभाग तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही उपाययोजना करण्यात आली आहे.

 

महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांनुसार, क्षेत्रीय काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे. अत्यावश्यक काम असल्यास योग्य ती खबरदारी घेऊनच कामकाज करावे. तसेच सकाळी 11 पूर्वी किंवा सायंकाळी 4 नंतर क्षेत्रीय कामे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात पुढील काही दिवसात उष्णता अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -