Homeइचलकरंजीइचलकरंजी : नाझीया ठगरी यांच्या घरी चोरी; पावणेदोन लाखाचा मुद्देमाल लंपास

इचलकरंजी : नाझीया ठगरी यांच्या घरी चोरी; पावणेदोन लाखाचा मुद्देमाल लंपास

कोरोची धनगर माळ परिसरात घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यानी सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा १ लाख ६५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी नाझीया राहिल ठगरी (वय ३९ रा. कोरोची) यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोरोची येथील धनगर माळ परिसरात राहणाऱ्या नाझिया ठगरी यांच्या घरी कोणी नव्हते. हीच संधी साधत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला.

लाकडी कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले १ लाख २६ हजाराचे सोन्याचे व ३० हजार ८०० रुपयांचे चांदीचे दागिने व ५ हजाराची रोकड असा १ लाख ६५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. ही घटना १६ ते १७ मे च्या दरम्यान घडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -