Friday, May 22, 2026
Homeमहाराष्ट्रअमूल'पाठोपाठ 'गोकुळ' दूध दरातही दोन रुपयांची वाढ

अमूल’पाठोपाठ ‘गोकुळ’ दूध दरातही दोन रुपयांची वाढ

इंधन आणि सीएनजी दरवाढीनंतर आता दुधाच्या किमतीतही वाढ झाली आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ जाहीर केली आहे.

 

वाढत्या उत्पादन खर्चामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पशुखाद्य, वाहतूक, प्रक्रिया आणि वितरण खर्च वाढल्याने दूध व्यवसायावर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दूध दरवाढ अपरिहार्य असल्याचे संघाकडून स्पष्ट करण्यात आले.

 

अमूलनंतर गोकुळनेही दरवाढ केल्याने राज्यातील इतर दूध संघांकडूनही दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच, दुग्धजन्य पदार्थांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

 

दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव दरांचा काही प्रमाणात फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

मात्र एकीकडे चारा आणि इतर खाद्यान्नाचे दर वाढल्याने उत्पादकांना याचा किती फायदा होईल याविषयी साशंकता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -