Homeमहाराष्ट्रवाहनांना 'एचएसआरपी'साठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ

वाहनांना ‘एचएसआरपी’साठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ

ज्या वाहनांची 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झाली आहे, अशा सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक आहे. याकरिता 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत होती; मात्र या कालावधीत सर्व कामकाज पूर्ण न झाल्याने अशी नंबर प्लेट बसविण्यासाठी आता दि.30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

अशी एचएसआरपी (नंबर प्लेट) नसलेल्या वाहनांवर दि.1 जुलै पासून कारवाई केली जाणार आहे; मात्रज्या वाहनधारकांनी दि.30 जूनपूर्वी अशी नंबर प्लेट बसविण्यासाठी पुढील अपॉईमेंट घेतली आहे, त्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असेही परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

 

प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन मालकीचे हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रात पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, विमा अपडेट, इत्यादी वाहनसंदर्भातील कामे वाहनांना एचएसआरपी बसविल्याचे प्रमाणिकरण केल्यानंतरच करण्यात येणार आहे. त्यानुसार संबधित सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -